“यावेळी आघाडीचंच सरकार येणार…”, लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली…
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. भागलपूरमधून काँग्रेसचे उमेदवार अजित शर्मा, प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्माचे वडील, निवडणूक लढवत आहेत. नेहानं वडिलांच्या प्रचारात सहभाग घेत रोड शो केला आणि जनतेला मतदानाचं आवाहन केलं. तिच्या प्रचाराच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेहानं वडिलांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना मत देण्याचं आवाहन केलं आहे.