अनुपम खेर अजूनही भाड्याच्या घरात राहतात, नेमकं कारण काय? म्हणाले, “माझ्या मृत्यूनंतर…”
बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी सांगितलं की, आर्थिक क्षमता असूनही ते भाड्याच्या घरात राहतात कारण मृत्यूनंतर कुटुंबात वाद होऊ नयेत. त्यांनी त्यांच्या सावत्र मुलगा सिकंदरविषयीही मतं मांडली, सांगितलं की, पालकांनी मुलांना मोकळीक दिली पाहिजे, म्हणजे ते स्वतःच्या चुका करून शिकतील.