“गेलं एक-दीड वर्ष कठीण…”, गोविंदाबरोबरच्या घटस्फोटाच्या अफवांवर पत्नी सुनीताची प्रतिक्रिया
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील मतभेदांच्या अफवा खोट्या असल्याचे सुनीताने स्पष्ट केले आहे. तिने सांगितले की, ती गोविंदाबरोबर आनंदात आहे आणि घटस्फोट घेत नाहीये. सुनीताने स्वतःचे युट्युब चॅनल सुरू केले असून, पहिल्या व्लॉगमध्ये तिने चंदीगडमधील मंदिराला भेट दिली आहे. सुनीताने देवीवर विश्वास ठेवत, तिच्या कुटुंबाबद्दलच्या अफवांना उत्तर दिले आहे.