ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांना इरफान खान यांनी केलेली शिवीगाळ, प्रसिद्ध अभिनेता म्हणाला…
इरफान खान यांनी 'मकबूल' चित्रपटाच्या सेटवर ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मजेमुळे संयम गमावल्याची आठवण दीपक डोब्रियाल यांनी सांगितली. एका भावनिक सीनमध्ये ओम पुरी यांच्या मजेशीर उच्चारांमुळे सीन वारंवार थांबत होता. इरफान खान यांचा संयम सुटला आणि त्यांनी शिवी दिली, पण लगेच माफी मागितली. यानंतर सेटवर गंभीर वातावरण निर्माण झाले आणि अखेरचा टेक यशस्वीपणे पूर्ण झाला.