Video: “त्याचा दोष…”, अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया
अभिनेता अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली आहे. या घटनेत ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. अल्लू अर्जुनने या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. अभिनेता वरुण धवनने अल्लू अर्जुनला दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.