“नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठे फेमिनिस्ट”, कंगणा रणौतकडून पंतप्रधानांचं कौतुक
बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगणा रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. एका मुलाखतीत तिने मोदींना "जगातील सर्वात मोठे फेमिनिस्ट" म्हटलं आहे. कंगणाने सांगितलं की, मोदींनी सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या आयुष्य सुलभ करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत, जसे की टॉयलेटची समस्या सोडवणं, स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध करून देणं, महिलांचे बँक खाते उघडणं आणि राजकारणात आरक्षण देणं.