‘भारत माता की जय’ म्हणताच जान्हवी कपूर ट्रोल, ट्रोलर्सना दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावली. तिच्या 'परम सुंदरी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती उपस्थित होती. कार्यक्रमातील 'भारत माता की जय' म्हणण्याच्या व्हिडीओवरून तिला ट्रोल करण्यात आलं. जान्हवीने इन्स्टाग्रामवर मूळ व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं. तिने मराठीतून भाषण देत प्रेक्षकांना 'परम सुंदरी' पाहण्याचं आवाहन केलं.