Video : धबधब्याच्या ठिकाणी दारू आणि पाण्याच्या बाटल्यांचा कचरा पाहून बॉलीवूड गायकाचा संताप
बॉलीवूड गायक विशाल ददलानीने कामशेतच्या धबधब्याजवळील कचऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पर्यटकांना कचरा न करण्याचे आवाहन केले आहे. विशालने म्हटले की, "पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पेपर प्लेट्स आणि दारूच्या बाटल्या इथे टाकण्यापेक्षा बरोबर घेऊन जा." त्याने महाराष्ट्र आणि भारत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.