‘चक दे इंडिया’ तयार कसं झालं? जाणून घ्या, शाहरुख खानच्या गाजलेल्या गाण्याचा रंजक किस्सा
'चक दे इंडिया' हे शाहरुख खानच्या गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हे गाणं वाजवण्यात आलं. संगीतकार सलीम-सुलेमान यांनी सांगितलं की, हे गाणं तयार करताना अनेक अडचणी आल्या होत्या. आदित्य चोप्रा यांच्या मार्गदर्शनानंतर हे गाणं तयार झालं. २००७ मध्ये भारताने T-20 वर्ल्ड कप जिंकल्यावर या गाण्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता वाढली.