‘छावा’ फेम अभिनेता लग्नानंतर तीन वर्षांनी झाला बाबा; घरी चिमुकल्याचं आगमन, म्हणाला…
'छावा' चित्रपटातील अभिनेता विनीत कुमार सिंह बाबा झाला आहे. त्याच्या घरी एका मुलाचा जन्म झाला आहे. विनीतने सोशल मीडियावर 'It's Boy' अशी पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. त्याच्या पत्नी रुचिरानेही आपल्या आनंदाच्या भावना व्यक्त केल्या. विनीतच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. २०२१ मध्ये विवाहबद्ध झालेल्या विनीत आणि रुचिरा यांनी तीन वर्षांनी आई-बाबा झाल्याची खुशखबर शेअर केली आहे.