“कास्टिंग काऊचच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”, अभिनेत्रीचा ‘त्या’ घटनेबद्दल स्पष्टीकरण
फातिमा सना शेखने दक्षिण सिनेसृष्टीतील एका कास्टिंग एजंटकडून वाईट अनुभव आल्याचं तिने म्हटलं होतं. मात्र, तिच्या वक्तव्याचा विपर्यास झाला असल्याचं तिने आता स्पष्ट केलं. संपूर्ण दक्षिण चित्रपटसृष्टी अशी नाही, ती एक विशिष्ट घटना होती. फातिमाने सांगितलं की, अशा घटनांचा सामना प्रत्येक क्षेत्रात करावा लागतो.