जिनिलीया डिसुझाचं चुकून जॉन अब्राहमशी झालेलं लग्न? देशमुखांच्या सूनबाईने चर्चेवर सोडलं मौन
अभिनेत्री जिनिलीया देशमुखने २०११ मध्ये 'फोर्स' चित्रपटात जॉन अब्राहमसोबत काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचे चुकून लग्न झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. जिनिलीयाने या अफवांना खोटे ठरवले आहे. जिनिलीया आणि रितेश देशमुखने २०१२ मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुलं आहेत. जिनिलीयाने दशकभराचा ब्रेक घेतला होता आणि २०२२ मध्ये 'वेड' चित्रपटातून पुनरागमन केले. ती लवकरच 'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खानसोबत दिसणार आहे.