सिद्धू मूसेवाला रोज लॉरेन्स बिश्नोईला मेसेज करायचा; गोल्डी ब्रारचा दावा
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची २०२२ साली लॉरेन्स बिश्नोई व त्याच्या गँगने हत्या केली होती. बीबीसीच्या 'द किलिंग कॉल' डॉक्युमेंटरीमध्ये गोल्डी ब्रारने सांगितले की सिद्धू आणि लॉरेन्स २०१८ पासून संपर्कात होते. सिद्धू बिश्नोईच्या विरोधक बम्बीहा टोळीशी मैत्री करू लागल्याने तणाव वाढला. विक्की मिद्दुखेराच्या हत्येतील कथित सहभागामुळे सिद्धूची हत्या झाली, असे गोल्डीने म्हटले.