‘हाऊसफुल ५’ नंतर आता प्रसिद्ध अभिनेत्रीची सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ मध्येही वर्णी
'बॉर्डर २' या बहुचर्चित चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोझांज, अहान शेट्टी आणि सोनम बाजवा हे कलाकार झळकणार आहेत. सोनम बाजवा पंजाबी मुलीची भूमिका साकारणार असून दिलजीत दोझांजसोबत तिची केमिस्ट्री पाहणं रंजक ठरेल. चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग करत असून तो २६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'बॉर्डर' चित्रपटाची आठवण आजही देशभक्तीच्या प्रसंगी आवर्जून काढली जाते.