“तुमच्या घरी असं घडलं असतं तर…?” पापाराझींवर का चिडले जॅकी श्रॉफ? नेटकरी म्हणाले…
जॅकी श्रॉफ पापाराझींवर चिडले : पंकज धीर यांच्या शोकसभेत जॅकी श्रॉफ सहभागी झाले होते. या संवेदनशील प्रसंगात पापाराझींनी सभ्यता राखावी, असे त्यांनी सांगितले. एक फोटोग्राफर त्यांच्या जवळ येताच जॅकी श्रॉफ चिडले आणि त्याला समजावले. सोशल मीडियावर त्यांच्या संयमाचे कौतुक झाले. नेटकऱ्यांनी पापाराझींवर टीका केली.