करण जोहरच्या नवीन चित्रपटाची घोषणा! मुख्य भूमिकेत असणार जान्हवी कपूर व टायगर श्रॉफ
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील पदार्पणामुळे चर्चेत आहे. करण जोहर निर्मित 'होमबाऊंड' चित्रपटाच्या निमित्ताने तीने कान्समध्ये हजेरी लावली होती. आता ती 'लग जा गले' या राज मेहता दिग्दर्शित चित्रपटात टायगर श्रॉफसोबत पहिल्यांदाच झळकणार आहे. तसेच, ती 'परमसुंदरी' आणि 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या आगामी चित्रपटांमध्येही दिसणार आहे.