जुही चावलाचा नवरा कर्जामुळे झालेला उद्ध्वस्त; पण आता आहे कोटींचा मालक, यामुळे बदललं नशीब
प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला, जी सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण तिच्या खासगी आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत येत असते. करीअरच्या शिखरावर असताना तिने उद्योजक जय मेहता यांच्याशी लग्न केलं. पण एकेकाळी ते कर्जात बुडाले होते. यावेळी जय मेहता यांनी कर्जातून बाहेर येत स्वतःचा व्यवसाय उभारला आणि आयपीएलच्या 'कोलकाता नाईट रायडर्स' संघात गुंतवणूक केली. दरम्यान, १९९५ मध्ये जुही आणि जय यांनी लग्न केलं. या कठीण काळात त्यांनी एकमेकांना साथ दिली.