विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच होणार आई-बाबा, क्युट फोटो शेअर करीत दिली गुडन्यूज
बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी सोशल मीडियावर आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक क्युट फोटो शेअर करत, "आम्ही आमच्या आयुष्यातील एका सुंदर अध्यायाची सुरुवात करीत आहोत," असे म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. २०२१ मध्ये राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलेल्या या जोडप्याने लग्नाच्या चार वर्षांनंतर ही गुड न्यूज दिली आहे.