“सगळं संपलं, आता मी मरणार…”, मनीषा कोईरालाने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. २०१२ साली गर्भाशयाचा कर्करोग झाल्यानंतर तिने उपचार घेत आजारावर मात केली. नुकतीच तिला ब्रॅडफोर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली. मनीषाने ९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती शेवटची 'हिरामंडी' वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.