“रडत नव्हते म्हणून दिग्दर्शकाने थोबाडीत मारली”, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव; म्हणाली…
अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा एक वाईट अनुभव शेअर केला आहे. त्या फक्त चार वर्षांच्या असताना 'नाग मेरे साथी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक शांतीलाल सोनी यांनी त्यांना थोबाडीत मारली होती. पल्लवी यांना रडायचं होतं, पण त्या हसत राहिल्यामुळे दिग्दर्शकाने त्यांना मारलं. या घटनेमुळे पल्लवींचा अहंकार दुखावला होता.