‘हिरामंडी’मधील भूमिका न आवडल्याने ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने दिलेला नकार
संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' वेब सीरिजमध्ये काम करण्यास अभिनेत्री मुमताज यांनी नकार दिलेला. मुमताज यांनी सांगितलं की, या सीरिजमध्ये कलाकारांची मोठी स्टारकास्ट असून प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण आहे, परंतु त्यांना स्वतःसाठी महत्त्वपूर्ण भूमिका हवी होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीबद्दलही बोलताना सांगितलं की, वयाच्या सातव्या वर्षापासून काम करत असल्याने ब्रेक घेताना त्यांना काहीच चुकल्यासारखं वाटलं नाही.