“तू सुरक्षित आहेस; कारण तू महिला आहेस”, नाना पाटेकरांनी दिग्दर्शिकेवर व्यक्त केलेला संताप
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दल अनेक किस्से आहेत. 'दिशा' चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरांनी अनेकदा राग व्यक्त केला होता, असे दिग्दर्शिका सई परांजपे यांनी सांगितले. तिसऱ्यांदा त्यांना संतापलेलं पाहून दिग्दर्शिकेचा सुद्धा पारा चढला होता. तेव्हा नाना त्यांना "तू सुरक्षित आहेस कारण तू एक महिला आहेस नाहीतर तू इथे नसतीस" असं म्हणाले होते.