‘तुम्ही प्रोपगंडा चित्रपट बनवता’ असं म्हणणाऱ्यांना पल्लवी जोशींचं थेट उत्तर, म्हणाल्या…
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला; काहींनी कौतुक केले तर काहींनी प्रचारकी असल्याची टीका केली. पल्लवी जोशी यांनी टीकाकारांना उत्तर देत, काश्मिरी पंडितांच्या त्रासाबद्दल चित्रपट असल्याचे स्पष्ट केले. याबद्दल त्यांनी "हा चित्रपट आणण्याचा उद्देशच हा होता, की ही काश्मीरची गोष्ट नाही तर ही आपल्या भारताची गोष्ट आहे. काश्मीरला तुम्ही वेगळं नका समजू" असं म्हटलं.