‘द ताज स्टोरी’ चित्रपटाच्या वादावर अखेर परेश रावल यांनी सोडलं मौन; म्हणाले…
परेश रावल यांचा आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' वादात अडकला आहे. वकील शकील अब्बास यांनी ऐतिहासिक बाबींची मोडतोड केल्याचा आरोप केला आहे, तर अयोध्याच्या भाजपा नेत्याने चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. परेश रावल यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटात काहीही चुकीचं नसल्याचं सांगितलं. चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार अमरीश गोयल यांनी योग्य संशोधन केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ३१ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.