प्रीती झिंटाची कौतुकास्पद कामगिरी, सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांसाठी दिले ‘इतके’ कोटी
बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली आहे. सध्या ती बॉलीवूडपासून दूर असली तरी आयपीएलमुळे चर्चेत असते.भारतीय सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलांच्या भविष्यातील कल्याणासाठी प्रीतीनं ₹१.१० कोटी रुपये आर्थिक मदत म्हणून देणगी दिली आहे. प्रीतीनं ही देणगी दक्षिण-पश्चिम कमांडच्या ‘आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन’ला (AWWA) दिली आहे. तिचे वडील भारतीय सैन्यात मेजर होते, त्यामुळे तिला सैन्याप्रती विशेष प्रेम आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती 'लाहोर १९४७' चित्रपटातून पुनरागमन करणार आहे.