“लोकांना वाटतं हा ऐश करतोय…”, आर. माधवनने सांगितला तरुण अभिनेत्रींसह काम करण्याचा अनुभव
अभिनेता आर. माधवन अलीकडेच 'आप जैसा कोई' चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्याने 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत करिअर, रिलेशनशिपमधील समानता आणि वाढतं वय याबद्दल मत मांडलं. तरुण अभिनेत्रींसह काम करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात, असं तो म्हणाला. वय वाढल्यामुळे २२ वर्षांच्या मुलाप्रमाणे कामं करता येत नाहीत, हेही त्याने मान्य केलं.