परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच देणार गुड न्यूज? कपिल शर्माच्या शोमध्ये खुलासा
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचे पती, खासदार राघव चड्ढा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिसले. शोमध्ये कपिलने लग्नानंतर मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिल्याचा किस्सा सांगितला. यावर राघवने हसत-हसत "लवकरच गुड न्यूज देऊ" असे म्हटले, ज्यामुळे परिणीती थोडीशी दचकली. परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा १३ मे २०२३ रोजी झाला आणि २४ सप्टेंबर २०२३ रोजी उदयपूरमध्ये लग्न झाले.