रेणुका शहाणे ‘या’ कारणामुळे मालिकांमध्ये करत नाहीत काम, म्हणाल्या…
प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या मालिकांबद्दल आपले मत मांडले आहे. त्यांनी सांगितले की, मालिकांमध्ये तेच तेच दाखवले जाते आणि महिलांना नेहमी एकमेकांबद्दल वाईट बोलताना दाखवले जाते. त्यामुळे त्यांनी सासूच्या भूमिकेसाठी आलेली ऑफर नाकारली. रेणुका शहाणे यांनी 'देवमाणूस' चित्रपटात महेश मांजरेकर, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्यासह काम केले आहे.