Kantara Chapter 1 पाहून भारावला रितेश देशमुख; अभिनेकडून चित्रपटाचं भरभरून कौतुक; म्हणाला…
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा : अ लिजेंड - चॅप्टर १' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. अनेक दाक्षिणात्य आणि बॉलीवूड कलाकारांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. मराठी अभिनेता रितेश देशमुखनेही इन्स्टाग्रामवर सिनेमाचं आणि ऋषभ शेट्टीचं कौतुक केलं आहे. रितेशने सिनेमातील उत्कृष्ट व्हीएफएक्स, अॅक्शन, छायाचित्रण, पार्श्वसंगीत आणि सेट डिझाईनचं विशेष कौतुक केलं.