“करिनाला पाहून ‘ही छोटी मुलगी कोण?’ असं म्हणालेला सैफ अली खान; पहिल्या भेटीबद्दल म्हणाला
सैफ अली खानने पहिल्यांदा करीनाला फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये पाहिलं तेव्हा ती लहान मुलगी होती. त्याने विचारलं की ती कोण आहे, तेव्हा कळलं की ती करीना कपूर आहे. सैफला ती खूप सुंदर वाटली. २००८ साली 'टशन' चित्रपटाच्या सेटवर त्यांचं प्रेम फुललं आणि २०१२ साली त्यांनी लग्न केलं. सैफचं आधी अमृता सिंहसोबत लग्न झालं होतं.