आमिर खान नाही तर ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार होता सलमान खान; अभिनेता म्हणाला…
सलमान खानने 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. त्याने पापाराझींशी संवाद साधताना सांगितलं की, आमिर खानच्या आधी तो या चित्रपटात काम करणार होता. आमिरने त्याला विचारलं होतं, पण नंतर स्वत: काम करण्याचा निर्णय घेतला. शाहरुख खाननेही आमिरला शुभेच्छा दिल्या. 'सितारे जमीन पर' हा २००७ साली आलेल्या 'तारे जमीन पर'चा सिक्वेल आहे.