शत्रुघ्न सिन्हांनी सांगितला ‘तो’ किस्सा; पुनम सिन्हा यांच्या आईचा लग्नासाठी होता नकार
शत्रुघ्न सिन्हा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी ९० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. परंतु, त्यांच्या सासूबाईंना ते जावई म्हणून पसंत नव्हते. 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पत्नी पूनम सिन्हा यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. पूनम यांच्या आईने सुरुवातीला त्यांच्या लग्नाला नकार दिला होता, पण नंतर होकार दिला. त्यांच्या लग्नाला ४५ वर्षे झाली असून, त्यांना तीन मुलं आहेत.