श्वेता तिवारीने लेकीच्या डेटिंगच्या अफवांवर दिलं उत्तर, पलक अन् इब्राहिमबद्दल म्हणाली…
मनोरंजन विश्वात कलाकारांच्या डेटिंगबद्दल अनेक अफवा पसरतात. अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांच्या नात्याबद्दलही अशाच चर्चा आहेत. श्वेता तिवारीने या अफवांवर प्रतिक्रिया देत सांगितलं की, पलकचं नाव अनेक मुलांशी जोडलं जातं, ज्यामुळे तिला चिंता वाटते. पलक निरागस असून ट्रोल्सकडे दुर्लक्ष करते. श्वेताने मजेशीरपणे सांगितलं की, पलक कधी कधी तिला डेटिंगबद्दल मजेत सांगते, पण हे त्रासदायकही असतं.