“रात्री ४ वाजता माझ्या खोलीत…”, सोनाक्षी सिन्हाला आलेला भयानक अनुभव; म्हणाली…
सोनाक्षी सिन्हा लवकरच 'निकिता रॉय' या चित्रपटातून झळकणार आहे, जो २७ जूनला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी ती 'हिरामंडी'मध्ये दिसली होती. एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या भयावह अनुभवाबद्दल सांगितले. तिला घरात विचित्र अनुभव आला, ज्यामुळे ती घाबरली होती. तिने सांगितले की, रात्री ४ वाजता तिला कोणीतरी जागं करण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे वाटले. ती खूप घाबरली होती आणि पुढील काही दिवस या विचारात होती.