अभिनेत्री सोनाली बेंद्रे राज ठाकरेंबद्दल म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका कार्यक्रमातील व्हिडीओमुळे राज ठाकरे यांचा सोनालीवर क्रश असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोनालीने या चर्चांना फेटाळून लावताना स्पष्ट केलं की ती व्हिडीओमध्ये तिच्या बहिणीशी बोलत होती. सोनालीने राज ठाकरे आणि तिच्या कुटुंबातील जुने संबंध स्पष्ट केले आणि राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं.