कोणाच्या भीतीमुळे आमिर खान बाळगतो पिस्तूल? सुनील शेट्टीने केला खुलासा, म्हणाला…
१९९० आणि २००० च्या दशकात बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डचे संबंध असल्याच्या अफवा होत्या. त्यामुळे अंडरवर्ल्डच्या भितीमुळे आमिर खान बंदूक बाळगत असल्याच्या अनेक अफवा होत्या. या सगळ्या अफवांवर अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल त्याने "हा सगळा मूर्खपणा आहे, आम्ही सुरक्षित आहोत" असे स्पष्ट केले. दरम्यान, आमिर खान सध्या 'सितारे जमीन पर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत आहे. येत्या २० जून २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.