‘हे’ होते संजय कपूर यांचे शेवटचे शब्द, मधमाशी घशात अडकल्याने झालं निधन
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती व उद्योजक संजय कपूर यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. इंग्लंडमध्ये पोलो खेळताना त्यांच्या तोंडात मधमाशी शिरल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. संजय कपूर ५३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्र आणि क्लबचे मोठे नुकसान झाले आहे. संजय कपूर यांची एकूण संपत्ती अंदाजे १०,३०० कोटी रुपये आहे.