Cannes मधील लूकवरुन ऐश्वर्या रायशी तुलना करणाऱ्यांना उर्वशी रौतेला म्हणाली…
यंदाच्या ‘कान्स २०२५’ महोत्सवात भारतीय अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपली उपस्थिती दर्शवली. तिच्या रेड कार्पेट लूकची ऐश्वर्या रायच्या २०१८ लूकशी तुलना झाली. उर्वशीने टीकाकारांना उत्तर देत म्हटलं की, ती कोणाचीही नक्कल करत नाही. मी इथे कोणाचीही कॉपी बनण्यासाठी आलेली नाही. तिने ट्रोलर्सना ब्लॉक केलं असून चाहत्यांना अफवांकडे लक्ष न देण्याचं आवाहन केलं आहे.