दादा कोंडकेंच्या गाजलेल्या गाण्यावर वरुण धवन-जान्हवी कपूर यांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा आगामी सिनेमा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' २ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. प्रमोशनसाठी त्यांनी एका दांडिया कार्यक्रमात हजेरी लावली आणि 'ढगाला लागली कळ' या मराठी गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शशांक खेतान दिग्दर्शित या सिनेमात रोहित सराफ, सान्या मल्होत्रा, मनीष पॉल यांच्याही भूमिका आहेत.