हृतिक रोशनने फक्त ५ आठवड्यांत केलं ट्रान्सफॉर्मेशन, जाणून घ्या अभिनेत्याचा फिटनेस फंडा
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या 'वॉर २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने ५ आठवड्यांत कमाल ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं. हृतिकने प्रशिक्षक क्रिस गॅथिन, कोच स्वप्नील हजारे आणि गर्लफ्रेंड सबा आझाद यांचे आभार मानले. 'वॉर २' चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.