जावेद अख्तर यांनी सद्गुरूंवर भक्तांशी धोकादायक खेळ खेळत असल्याचा केलेला आरोप
काही वर्षांपूर्वी ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव आणि लेखक-गीतकार जावेद अख्तर यांच्यात मानवी तर्क, श्रद्धा व विश्वास यावर वाद झाला होता. जावेद अख्तर यांनी आध्यात्मिक गुरूंवर टीका करताना म्हटलं की, ते लोक निष्पापांवर धोकादायक खेळ खेळतात. सद्गुरूंनी जावेद अख्तर मेंदू वापरत नसल्याचं म्हटलं. अख्तर यांनी श्रद्धा आणि तर्क यावर जोर देत, पुरावे नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.