‘मै हूँ ना’ सिनेमात शाहरुख खानच्या भावाच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्यांना होती पसंती
'मै हूँ ना' हा शाहरुख खानच्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. फराह खानने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. झायेद खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, लक्ष्मणच्या भूमिकेसाठी आधी हृतिक रोशन, अभिषेक बच्चन व सोहेल खान यांना विचारणा झाली होती. नंतर ही भूमिका झायेदला मिळाली. शाहरुख खानने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झायेदला खूप मदत केली होती.