भारतातील सर्वात मोठ्या IT कंपनीच्या कर्मचाऱ्यांना AI चा फटका; १२ हजार लोक नोकरी गमावणार
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. भारतातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीने १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन यांनी सांगितले की, तंत्रज्ञानातील बदलांना सामोरे जाण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.