ITR भरण्याची १६ सप्टेंबरची मुदत चुकली? घाबरू नका, त्यावरही आहे मार्ग!
प्राप्तीकर रिटर्न (ITR) भरणे प्रत्येक नोकरदारासाठी महत्त्वाचे आहे. यंदा सरकारने तीन वेळा मुदत वाढवून दिल्यानंतर, १६ सप्टेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. तरीही, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत विलंब शुल्कासह ITR भरता येईल. विलंब शुल्क १ हजार ते ५ हजार रुपये असेल. उशीर झाल्यास व्याज आकारणी, परताव्यात विलंब आणि सखोल तपासणी होऊ शकते.