१४० अब्ज डॉलर्सचं नेटवर्थ, तरीही टॉप १० अब्जाधिशांच्या यादीत नाही वॉरेन बफेंचं नाव
वॉरेन बफे यांचं नाव जगातील १० प्रमुख अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेलं आहे. त्यांच्या नेटवर्थमध्ये घट झाल्याने ते ११ व्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांच्या जागी डेल टेकचे सीईओ मायकल डेल यांनी १० व्या स्थानावर प्रवेश केला आहे. एलॉन मस्क ३७१ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह पहिल्या क्रमांकावर आहेत, तर लॅरी एलिसन, मार्क झुकरबर्ग, आणि जेफ बेजोस अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, आणि चौथ्या स्थानावर आहेत.