सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रेयसीची हत्या, प्रियकराला खून प्रकरणात अटक
कर्नाटकातील गदगमध्ये सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकर सतीश हिरेमठला अटक केली आहे. सतीशने मधुश्री अंगडीची हत्या करून तिचा मृतदेह पुरला होता. पोलिसांनी तपासात सतीशच्या मोबाइल लोकेशनवरून संशय घेतला आणि चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. फॉरेन्सिक चाचणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.