“अपघातानंतर मला शुद्ध आली तेव्हा..”, दुर्घटनेतून वाचलेले विश्वास रमेश यांनी सांगितला अनुभव
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या AI 171 विमानाचा भीषण अपघात झाला. 242 प्रवाशांपैकी फक्त विश्वास कुमार रमेश हेच चमत्कारिकरीत्या बचावले. टेकऑफनंतर 30 सेकंदांतच विमान कोसळले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विश्वास यांनी आपल्या भावाला शोधण्याची आर्जवं केली. ते भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असून दीव येथे आपल्या भावासोबत आले होते. अपघातात 241 प्रवासी आणि सर्व क्रू मेंबर्स मृत्युमुखी पडले.