अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व २४२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती, पोलिसांनी दिली माहिती
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा टेक ऑफनंतर पाच मिनिटांत अपघात झाला. या अपघातात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली. विमानात २ वैमानिक आणि १० केबिन क्रू मेंबर्स होते. कॅप्टन सुमीर सभरवाल हे वैमानिक होते, ज्यांना ८२०० तासांचा उड्डाण अनुभव होता. इंडियन एक्स्प्रेसने ही माहिती दिली आहे.