धक्कादायक! ६ महिन्यात १२ वेळा बलात्कार; पद्म पुरस्कार विजेत्या महंतावर महिलेचा आरोप
पद्मश्री पुरस्कार विजेते महंत कार्तिक महाराज यांच्यावर पश्चिम बंगालमधील एका महिलेने बलात्कार, गर्भपात आणि धमकविल्याचा आरोप केला आहे. महिलेने दावा केला की, नोकरीचे आमिष दाखवून महाराजांनी २०१३ साली सहा महिन्यात १२ वेळा बलात्कार केला. कार्तिक महाराजांनी हे आरोप फेटाळले असून, पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.