“RCBचा सत्कार सोहळा सरकारने आयोजित केला नव्हता, आम्ही फक्त…”, सिद्धरामय्यांचं स्पष्टीकरण
बंगळुरूतील आरसीबीच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू आणि ४० हून अधिक जखमी झाले. विरोधकांनी कर्नाटक सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण दिलं की, सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता, केएससीए व आरसीबीने आयोजन केलं होतं. आम्ही राज्यपालांना निमंत्रण दिलं होतं. मात्र पावसामुळे कार्यक्रम फक्त २० मिनिटे चालला.